नाशिकमध्ये ‘दिल दोस्ती फाउंडेशन’चा वार्षिक डायरी व पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न!

दिल दोस्ती फाउंडेशनच्या वतीने दि. ४ जानेवारी २०२६ रोजी नाशिक येथे संस्थेच्या वार्षिक डायरीचे तसेच डॉ. पल्लवी पुरकर लिखित “गणपती बाप्पा मोरया” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा यशस्वीपणे पार पडला. दिल दोस्ती फाउंडेशनच्या संचालिका सौ. मृणाल सांगळे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक, लाइफ मेंबर्स तसेच नाशिकमधील प्रतिष्ठित डॉक्टर, उद्योजक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. हे पूजन श्री. श्रीकृष्ण पुरकर व सौ. मंगल श्रीकृष्ण पुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते डायरी व पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. निलेश पुरकर यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती देत, देणगीतून झालेल्या हृदयशस्त्रक्रियांबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. पल्लवी पुरकर यांनी “गणपती बाप्पा मोरया” या पुस्तक लिहिण्याची प्रेरणा व लेखनप्रवास उपस्थितांसमोर उलगडून सांगितला.

डॉ. नितीन ठाकरे यांनी दिल दोस्ती फाउंडेशनच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त करत संस्थेच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले तर डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून दिल दोस्ती फाउंडेशनच्या उपक्रमांसाठी स्वयंसेवक म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले.

उपस्थित सर्वांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले अणि दिल दोस्ती फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.

Scroll to Top