
दिल दोस्ती फॉउंडेशन च्या वतीने “आजीच्या गोष्टी” या उपक्रमांतर्गत ‘रामायण – द एपिक सागा’ या विषयावर आधारित भव्य क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आली. या उपक्रमात ६ ते १५ वयोगटातील बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
स्पर्धेनंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी पारंपरिक खो-खो खेळाचा आनंद लुटला. यानंतर गुरु संदीप येवले सरांनी मुलांना भगवान श्रीरामावर आधारित एक सुंदर व प्रेरणादायी गोष्ट सांगितली. त्यांनी मुलांना वडीलधाऱ्यांशी आदरपूर्वक वागण्याचे, पालकांचा सन्मान करण्याचे तसेच सर्वांच्या प्रती आदरभाव ठेवण्याचे महत्त्व समजावले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. विनोद दशपुते सर होते. त्यांनी मुलांना संबोधित करत आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली.
डॉ. नितीन ठाकरे सरांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण केले. त्यांनी आपल्या संस्कृतीचा गौरव टिकवण्यासाठी सजग राहण्याचा संदेश दिला आणि नव्या पिढीने मूल्यसंस्कार आत्मसात करावेत, असे आवाहन केले.
श्री. हर्षल कोठावदे सरांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करत एक सुंदर कविता गायन करवून घेतले. त्यांच्या सर्जनशील सादरीकरणाने संपूर्ण वातावरण आनंदमय झाले.
कार्यक्रमादरम्यान पालकही उपस्थित होते व त्यांनी मुलांचा सहभाग पाहून समाधान व्यक्त केले. स्पर्धा सुरू असताना शुभांगी मॅडम, डॉ. पल्लवी पुरकर मॅडम, डॉ.वृषाली ठाकरे मॅडम आणि पालक प्रतिनिधी श्री. कोठावदे यांनी उत्तरपत्रिकांचे परीक्षण केले.
स्पर्धेनंतर निकाल जाहीर करण्यात आला. विजेत्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. इतर सर्व सहभागी मुलांना पुस्तकरूप गिफ्ट्स देण्यात आले.
डॉ. निलेश पुरकर आणि डॉ. पल्लवी पुरकर मॅडम यांनी त्यांच्या दूरदृष्टी, सूक्ष्म नियोजन आणि समर्पित नेतृत्वामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक परिणामकारक आणि संस्मरणीय केला.
कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात सोनन चरण मॅडम, शुभांगी व्हटकर मॅडम व श्री. अतुल नेरकर सर यांनी अत्यंत मनापासून सहभाग घेतला.
डॉ. पल्लवी पुरकर मॅडम यांनी सर्व अतिथींचे स्वागत करत आभार मानले.


