दिल दोस्ती फाउंडेशन-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर “१८५७ चे स्वातंत्र्यसमर”

आजीच्या गोष्टी”- २४/०२/२०२६दिल दोस्ती फाउंडेशन-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर “१८५७ चे स्वातंत्र्यसमर”

दिल दोस्ती फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेला “आजीच्या गोष्टी” हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या विषयावर आधारित “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” विशेष कार्यक्रम लहान मुलांमध्ये संस्कार, देशभक्ती आणि इतिहासाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.

श्री. प्रसाद धोपावकर भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस, RSS स्वयंसेवक व अभिनव भारत कार्यकर्ते हे या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. पल्लवी पुरकर यांनी उपक्रमाची सुरुवात केली, तर सूत्रसंचालन सौ. मानसी भादलीकर यांनी केले. यावेळी डॉ. नितीन ठाकरे, डॉ. निलेश पुरकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री. ऋतुराज भादलीकर यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी सावरकर यांच्या जीवनावर आधारित माहिती कथारूपात विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यानंतर श्री. प्रसाद धोपावकर यांनी सावरकरांचे क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व आणि “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात आली, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रश्नमंजुषेचे परीक्षण डॉ. वृषाली ठाकरे, डॉ. पल्लवी पुरकर व सौ. मानसी भादलीकर यांनी केले, तर सौ. मृणाल सांगळे यांनी गुणांकन करून विजेत्यांची निवड केली. कार्यक्रमाची सांगता सहभोजानाने झाली.

Scroll to Top