
२२ एप्रिल २०२५ रोजी Dil Dosti Foundation मार्फत कसबे वणी, दिंडोरी येथील वात्सल्यगृह अनाथाश्रम येथे ‘आजीचे लाडू’ या संकल्पनेअंतर्गत सदिच्छा भेट देण्यात आली.
आम्ही या मुलांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी पोषणमूल्य असलेले लाडू व इतर खाऊ प्रेमाने वाटले.
डॉ. पल्लवी पुरकर मॅडम मुलांसाठी गोष्टींची पुस्तके घेऊन आल्या होत्या. त्यांनी “श्रावणबाळ” ही गोष्ट मुलांना छानपणे सांगितली. सर्व मुलांनी ती गोष्ट खूप आनंदाने ऐकली व लाडूंचा मनमुराद आस्वाद घेतला.

डॉ. पूर्वी मेहता (Nutritionist) यांनी देखील मुलांना कोणत्या ऋतूमध्ये काय खावे, काय टाळावे आणि त्यांना कोणते अन्न पौष्टिक व आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांचे मन:पूर्वक आभार!
तसेच मिसेस मानसी भाडलिकर यांनी आमच्यासाठी विशेष पौष्टिक लाडू बनवून दिले, जे आम्ही मुलांना दिले. त्यांच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार!
आम्ही मिसेस कौशल्या पवार मॅडम यांच्याशी आश्रमातील कामकाज, मुलांच्या गरजा व व्यवस्थापन याबाबत सविस्तर संवाद साधला. त्या दरम्यान आश्रमातील मुले आनंदाने “lingorcha(लगोरी)” या खेळाचा आनंद घेत होती. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आमचं मन आनंदाने भरून टाकणारे होतं.
आम्ही Dil Dosti Foundation तर्फे एक आवाहन करतो की, ज्यांना अशा समाजकार्यात हातभार लावायचा आहे किंवा अशा आश्रमांना मदतीची इच्छा आहे, त्यांनी पुढे यावे. हे निष्पाप जीव तुमच्या प्रेमाची, साथाची आणि मदतीची वाट पाहत आहेत.
