


दिल दोस्ती फॉउंडेशन या सेवाभावी संस्थेने नवहितगुज महिला मंडळ यांच्या “आत्मनिर्भर नारी” या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोन शिवणयंत्रांसाठी आर्थिक सहकार्य केले. या उपक्रमामुळे दोन महिलांना शिवणयंत्र मिळाले असून त्या महिलांना आता स्वतःच्या कष्टावर उदरनिर्वाह करता येईल. परिणामी त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य मिळेल, मुलांना चांगले शिक्षण घेता येईल आणि महिलांना आत्मविश्वासाने व सन्मानाने जगता येईल.
या सर्व उपक्रमांतून दिल दोस्ती फॉउंडेशन या सेवाभावी संस्थेने नेहमीच समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध केली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने फाऊंडेशनने पुन्हा एकदा महिलांच्या सबलीकरणासाठी मोलाचे योगदान दिले.
“एक शिवणयंत्र – एक स्वावलंबी कुटुंब” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात दिल दोस्ती फाऊंडेशनची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.
कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी दिल दोस्ती फॉउंडेशन या सेवाभावी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले व अशा उपक्रमांमुळे समाजातील अनेक गरजू घटकांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
