



दिल दोस्ती फाउंडेशनच्या विद्यमाने दिनांक ०७.०२.२०२६ रोजी “आजीचे लाडू” या उपक्रमाअंतर्गत जनता विद्यार्थी वसतिगृह, गिरणारे लाडू वाटण्यासाठी आम्हास बोलावण्यात आले. त्यावेळी पहिल्यांदाच वस्तीगृहास भेट देण्याचा आमचा अनुभव अविस्मरणीय होता, तेथील अनुभव अतिशय हृदयस्पर्शी असा होता, प्रतिकुल परिस्थितीतील मुले तसेच काहींचे पालक हयात नाही अशी मुले या वसतिगृहात राहतात. पाचवी ते दहावी इयत्तेत शिकणारी मुले या वसतिगृहात आहेत, अतिशय शिस्तप्रिय विविध खेळांची, वाचनाची, आवड असणारे अभ्यासू तसेच टाळ पखवाजाच्या साथीने अतिशय सुंदर भजन व किर्तन गाऊन मुलांनी आम्हास मंत्रमुग्ध करून टाकले, त्यांच्यातील ही कला वाखाणण्याजोगी होती तसेच काही विद्यार्थ्यांनी भविष्यातील आपली मोठे बनण्याची स्वप्ने सांगितली. प्रतिकूल परिस्थितीतही आपण काहीतरी मोठे बनवून दाखवण्याची जिद्द या मुलांच्यात दिसली, वसतिगृहातील कर्मचारी, सेवक वर्ग अतिशय मनापासून त्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी प्रयत्न करत आहे हे जाणवले. मुलांच्या कलागुणांना तिकडे वाव दिला जातो हे त्यांनी वाजवलेले टाळ पखवाज, तालासुरात गायलेले भजन- कीर्तन तसेच तेथील भिंतीवर अतिशय सुबक अशी केलेली चित्रकला यावरून लक्षात येते .या मुलांना भेटून खरोखरच आम्हास मनाला खूप आनंद वाटला त्यासाठी दिल दोस्ती फाउंडेशनचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद!
दिल दोस्ती फाउंडेशनचे सभासद असल्याचा आज आम्हाला खरोखरच अभिमान वाटतो .
